मराठी, हिंदी, इंग्रजीच्या अभ्यासक्रम पूरक परीक्षा   

शालेय परीक्षा प्रसार विभाग,सौ. सारिका तांबे, समन्वयक

लोकमान्य टिळकांच्या मृत्युनंतर, महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने लोकमान्य टिळकांचे शैक्षणिक स्मारक म्हणून दि. ०६ मे १९२१ रोजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.या विद्यापीठाने गेल्या १०५ वर्षात राष्ट्रीय शिक्षणाच्या ध्येयाने काळानुरुप बदल करत सतत प्रगती करत राष्ट्राच्या उन्नती करिता तरुण पिढी घडविली. आधुनिक भारताची तरुणपिढी घडविण्यासाठी विद्यापीठात दोन प्रमुख उदिष्टे ठरविण्यात आली. इंग्रज सरकारची मदत न घेता शिक्षण कार्य चालविणे आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करुन ते स्वावलंबी व कार्यक्षम होतील असा शिक्षणक्रम ठरविणे यात मातृभाषेला देखील महत्व दिले गेले.
विद्यापीठाच्या इतिहासाबद्दल मा. कुलपती डॉ. दीपक टिळक सरांच्या तोंडून ऐकताना मार्गदर्शन करताना, वेगवेगळ्या कार्यक्रमातून डॉ. दीपक टिळक सांगताना विद्यापीठाला किती अडचणीतून जावे लागले हे लक्षात येते. १९२१ साली स्थापन झालेल्या विद्यापीठाला १९८७ साली शासन मान्यता मिळाली. स्वातंत्र्यानंतर विद्यापीठाला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. दीपक टिळक नेहमी सांगतात लोकमान्याच्या नावाने स्थापन झालेल्या या विद्यापीठास अनेक संकटे आली आणि त्यावर मात करुन विद्यापीठ शिक्षण क्षेत्रात योगदान देत राहिले. 
 
शालेय प्रसार परीक्षा विभाग हा मुलांचा सर्वांगिण विकास व्हावा या उद्देशाने सर्व महाराष्ट्रातील सर्व शालांत परीक्षा सुरु करण्याचे काम टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने सुरु केले शालेय प्रसार परीक्षा विभागाच्या माध्यमातून गेली ८५ वर्षे कार्यरत आहे. शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी तसेच इंग्रजी, गणित, विज्ञान इ. विषयांच्या अभ्यासाचा त्यांचा पाया पक्‍का व्हावा, या हेतूने दरवर्षी इंग्रजी, गणित, संस्कृत, मराठी भाषा इ. विषयांच्या परीक्षा वर्षातून फेब्रुवारी/सप्टेंबर या महिन्यात विद्यापीठांतर्गत विद्या प्रसारक मंडळ स्थापन करून परीक्षांचे नियोजन केले जाते. या परीक्षांचा अभ्यासक्रम शासनाने तयार केलेल्या शालेय अभ्यासक्रमास उपयुक्त व पूरक असल्याने या परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाल्या. शाळांना स्थानिक पातळीवर तत्पर सेवा उपलब्ध व्हावी यासाठी निवडक जिल्ह्यांमध्ये विभागीय कार्यालय व विद्यापीठाच्या शाखा सुरू केल्या आहेत. या परीक्षांचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घेता यावा तसेच या परीक्षांची माहिती अध्यापकांना, मुख्याध्यापकांना, विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार मेळावे आयोजित केले जातात.
 
नविन परीक्षा :
 
FFCE, SLEIT, GERM­AN, J­APA­NESE विद्यापीठ नियमित विषयांच्या परीक्षांबरोबरच ऑनलाईन पद्धतीने संगणक विषयाच्या विषय परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर इयत्तावार या परीक्षांचे आयोजन केले आहे. भविष्यातील व्यावसायिक शिक्षण पद्धतीला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी अशा परीक्षांची ओळख व्हावी, याच उद्देशाने विद्यापीठात या परीक्षा घेतल्या जातात. विद्यापीठाचा शालेय प्रसार परीक्षा विभाग व लोकमान्य टिळक पुण्यतिथी मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी, इंग्रजी, संस्कृत, हिंदी यामाध्यमातून  वक्तृत्व स्पर्धेचे नियोजन करीत आहे. पुणे जिल्ह्यातून विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. मुलांचा सर्वांगिण विकास व्हावा, वक्तृत्व गुण वाढीस लागावा, विद्यार्थ्यांमध्ये निर्भयता यावी तसेच मुलांपर्यंत लोकमान्यांचे विचार मनामध्ये रूजावित व आदर्श नागरिक म्हणून पुढे यावा, हीच यामागची भावना आहे.
 
नृत्यकला : (भरतनाट्यम, कथक, ओडिसी, लोकनृत्यकला) :
 
नृत्यकला परीक्षांच्या स्वतंत्र माहिती पुस्तिका अभ्यासक्रम व मार्गदर्शनपर पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत. अनेक शाळांमध्ये नृत्यकला विषय सुरू करण्याची इच्छा असते. मात्र कमी मानधनात नृत्यकला विषय शिक्षक उपलब्ध होत नसल्याने इच्छा असूनही हा विषय शाळेत घेता येत नाही. शाळांची गैरसोय विचारात घेऊन विद्यापीठाने शास्त्रीय, नृत्यकला या विषयाचा प्रसार व्हावा, ही सांस्कृतिक कला जोपासण्यासाठी विद्यापीठाच्या शालेय प्रसार परीक्षा विभागांतर्गत शास्त्रीय नृत्यकलेमधील विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. याचाच एकभाग म्हणून भरतनाट्यम, कथक, ओडिसी, लोकनृत्यकला नृत्यकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
 
आकर्षक पारितोषिके :
 
शालेय प्रसार परीक्षा विभागाचा शतक मोहोत्सव साजरा करताना हा विभाग मा. सरिता साठे यांच्या सुचनेनुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत असून, डॉ. दीपक टिळक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कुलगुरु डॉ. गीताली टिळक  यांच्या सहकार्याने उत्तरोत्तर प्रगती साध्य करीत राहिल.एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे लोकमान्य टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची यशस्वी वाटचाल सुरु आहे. त्या वाटचालीमध्ये लोकमान्य टिळकांची पिढी कार्यरत आहे हे विद्यापीठ पुढे नेण्यासाठी उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी या लोकमान्यांच्या तरुण पिढीला मुजरा!

Related Articles